Thursday 22 December 2011

पॉवर ऑफ युथ

आमचा बाणा.......
१ ) नव्या जगाचा वेध घेऊन नवे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न पॉवर ऑफ युथ करणार आहे.
२ ) जिथे जिथे चुकीचे काही घडत असेल त्या ठिकाणी आमच संघटन कडाडून विरोध करेल.
३) जात, धर्म , भाषा आणि प्रांत यांच्या पलीकडे जाऊन लढवय्या युवकांचे हे संघटन सकारात्मक पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे पाह्ण्यारांचे बळ असेल.
४ ) पॉवर ऑफ युथ या संघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे याला कोणी पदाधिकारी नसेल ना नेतृत्व. ते संघटीतपणे चालेल असा आमचा विश्वास आहे .
५ ) आम्ही वैचारिक आहोत पण तत्वज्ञानी नाही. आम्ही बुद्धिवंत आहोत पण उगीच अक्कल पाजळून वेळ दवडणारे नाही . आम्हाला प्रश्नाची उत्तरे शोधायची नाहीत तर प्रश्न समजून घ्यायचे आहेत. कारण प्रश्न समजून घेतल्यास उत्तरे आपोआप मिळतात यावर आमचा विश्वास आहे.
७ ) उठसुठ राजकारण आणि राजकारण्यांना आम्ही शिव्या घालणार नाही. व्यवस्था बदलून क्रांती करण्याच्या बढाया आम्ही मारणार नाही. कारण व्यवस्थेत काम करणारी माणसे तुमच्या आमच्या घरातीलच आहेत. व्यवस्था बदलण्याचा तांत्रिक खेळ खेळण्यापेक्षा माणसे सहज बदलू शकतात यावर आमचा एक लाख टक्के विश्वास आहे.
८ ) माणसे बदलण्यासाठी परस्पर संवाद हे आमचे शस्त्र असेल.
९ ) आमचं संघटन जरी लढवय्या असलं तरी उगीच तलवारींचा खणखणाट असणार नाही. नव्या जगाला साजेशी लोकशाही लढाई हे आमचं शस्त्र असेल.
१० ) जग बदलण्याची भाषा नव्हे तर आपण जिथे राहतो तिथली माणस बदलून सुधारणा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्हाला आपल्यासारख्यांच पाठबळ आहेच कारण आम्ही तुम्हाला गृहीत धरलंय !